नवी दिल्ली – पेगासस हेरगिरी प्रकरणात आता भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही उडी घेतली आहे.
स्वामी यांनी या संबंधात आपल्या ट्विटर अकौंटवर म्हटले आहे की, पेगासस स्पायवेअर कंपनी ही कमर्शिअल स्वरूपात काम करते. त्यांनी भारतात जे ऑपरेशन केले त्यासाठीही कोणी तरी पैसे दिले असणार हे नक्की आहे. जर भारत सरकारने या कंपनीची सेवा घेतली नसेल तर मग ही भारतात सेवा कोणी विकत घेतली त्याची माहिती लोकांपुढे आलीच पाहिजे.
It is quite clear that Pegasus Spyware is a commercial company which works on paid contracts. So the inevitable question arises on who paid them for the Indian “operation”. If it is not Govt of India, then who? It is the Modi government’s duty to tell the people of India
— Subramanian Swamy (@Swamy39) July 19, 2021
या प्रकरणात आमचा सहभाग नाहीं असा खुलासा सरकारने संसदेत केला आहे. तथापि पेगासस मार्फत भारतातील फोन मध्ये हेरगिरी झाली आहे हे स्पष्ट झाले आहे. मग ही हेरगिरी कोणी केली याविषयीचे गूढ वाढले आहे.