नगर – मनपाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील एका विभागातील कर्मचाऱ्याला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संपूर्ण इमारतीत औषध फवारणी करून निर्जंतुक करण्यात आली आहे. विनाकारण महापालिकेत येणाऱ्या नागरिकांना प्रतिबंध घालण्यात आला आहे. दरम्यान, आज जिल्ह्यात 21 रुग्णांची भर पडली आहे. बाधितांची संख्या 749 झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 21 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये नगर ग्रामीण सहा, नगर मनपा तीन, श्रीरामपूर, नेवासे तालुक्यांत प्रत्येकी दोन, अकोले, संगमनेर, श्रीगोंदा, राहुरी, जामखेड तालुक्यात प्रत्येकी दोन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भिंगार येथे एक व कर्जत तालुक्यातील एकाचा समावेश आहे.
शहरात महापालिकेकडून करोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असतानाच महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत एका विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला करोनाची बाधा झाल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.
नगर शहर व परिसरात करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून, शहरात तोफखाना, सिद्धार्थनगर, नालेगाव, आडतेबाजार, कवडेनगर, पद्मानगर हे परिसर कन्टेन्मेंट झोन करण्यात आलेले आहेत.
महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी संपूर्ण प्रशासकीय इमारत औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतरांना दोन दिवस कार्यालयात प्रवेश करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
महापालिका कार्यालयात दररोज मोठ्या प्रमाणावर होत असलेली गर्दी पाहता ही गर्दी टाळण्यासाठी या उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आज जिल्ह्यातील 13 रुग्ण करोनामुक्त झाले आहे. यामध्ये संगमनेर, राहाता, शेवगाव येथील प्रत्येकी एक, श्रीरामपूर तालुक्यातील पाच, नगर मनपा हद्दीतील दोन, भिंगार येथील तिघांचा समावेश आहे. बुधवारी (दि.8) रोजी रात्री उशिरा आलेल्या अहवालात संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार, पेमगिरी येथील एकाचा व पिंपळगाव कोंझिरा तीन, खांडगाव