भारतीय हॉकीतही करोनाचा शिरकाव

नवी दिल्ली – आजपर्यंत मुक्त राहिलेल्या हॉकी इंडिया या सर्वोच्च संघटनेतही करोनाने शिरकाव केला आहे. संघटनेच्या दोन कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या संघटनेच्या सर्व कर्मचाऱ्यांची चाचणी घेण्यात आली होती, त्यात दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने संपूर्ण कार्यालयच पुढील काही दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचे संघटनेने जाहीर केले आहे.

संघटनेत कार्यरत असलेल्या एकूण 30 कर्मचाऱ्यांची चाचणी घेण्यात आली होती. आता जे दोन कर्मचारी पॉझिटिव्ह सापडले आहेत, त्यांचा कुटुंबीय तसेच अन्य ज्यांच्याशी संपर्क आला होता त्यांचीही चाचणी घेण्यात येणार आहे. या सर्वांचे अहवाल पाहिल्यावर नेमके किती जण बाधित आहेत ते स्पष्ट होणार असून त्यानंतर जर हा धोका अन्य कोणालाही झालेला नसेल तर काही दिवसांनी संघटनेचे कार्यालय पूर्ववत सुरू होईल, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.