वाघोली -येथक्षल रोझ वूड पार्क परिसरातील सोसायटीमध्ये 60 वर्षीय वृद्धाला करोनाची लागण झाली आहे. सात दिवसांपूर्वीच वृद्ध कुटुंबासह सोलापूरहून वाघोली येथे दाखल झाले होते. बाहेर गावावरून आल्याने त्यांनी स्वतःला क्वारंटाइन केले होते.
दरम्यान, वृद्धाला श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर करोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटीव्ह आला असून त्यांना उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.