वाघोली – येथील परिसरातील 16 वर्षीय तरूणी व 20 वर्षी महिलेने करोनावर मात करून दोघी घरी परतल्या आहेत. बाईफ रोड येथील संभाजीनगर परिसरातील 16 वर्षीय मुलगी करोनावर मात करून घरी परतली आहे. तिचे वडील देखील पॉझिटिव्ह सापडले होते. वडील यशस्वी उपचार घेऊन पाच दिवसांपूर्वीच घरी परतले होते. मुलगी देखील घरी परतल्याने बाईफ रोडचा संभाजीनगर परिसर करोनामुक्त झाला आहे.
दरम्यान, वाघोली-भावडी रोडवर असणाऱ्या धूत कंपनी परिसरातील 20 वर्षीय कामगार महिला करोनावर मात करून घरी परतली आहे. प्रसूतीसाठी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर तपासणीमध्ये महिलेला लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. तिने एका बाळाला जन्म दिला असून बाळ निगेटिव्ह आले होते.