इस्लामाबाद – जगभरात करोना संसर्ग पुन्हा एकदा झापाट्याने वाढत आहे. त्याचवेळी अनेद देशांमध्ये करोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण सुरू आहे. भारतात देखील करोनाचे लसीकरण सुरू असून भारतात विकसीत झालेल्या लसीला जगभरात मागणी आहे. तर चीनने देखील करोनासाठी लस विकसीत केली आहे. मात्र या लसीचा वाईट अनुभव पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांनी चीनमध्ये विकसीत झालेली अर्थात चायना लस घेऊन दोन दिवस झाले होते. तोच त्यांना करोनाची लागण झाली आहे. पाकिस्तानमध्ये वेगाने कोरोनाचा प्रसार होत असतानाच इम्रान खान यांनी गुरुवारी चीनच्या कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता.
PM Imran Khan has tested positive for Covid-19 and is self isolating at home
— Faisal Sultan (@fslsltn) March 20, 2021
इम्रान खान यांचे विशेष सहाय्यक फैजल सुल्तान यांनी ट्विट करून खान यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर इम्रान खान यांनी स्वत:ला आयसोलेटेड करून घेतलं असून संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन देखील केलं आहे.