नवी दिल्ली – व्हायरसमुळे सुरक्षित प्रवास करण्याकडे ग्राहकांचा कल असेल त्यामुळे आगामी काळात कारचे मागणी वाढेल असे बहुतांश कंपन्यांना वाटते मात्र यात कार क्रयशक्ती कमी असल्यामुळे छोट्या कारणांमुळे मागणी वाढेल असे कार उत्पादकांना वाटते.
सज्जा सध्याचे ग्राहक किंवा नागरिक सार्वजनिक वाहतुकीच्या माध्यमातून प्रवास करतात असे नागरिक छोटे का होईना कार घेण्याचा प्रयत्न आगामी काळात करतील असे मारुती सुझुकी इंडिया कंपनीफचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले यासंदर्भात आम्ही त्यांचे सर्वेक्षण केले असून या सर्वेक्षणातून नही या बाबी दिसून आल्यामुळे आम्ही आगामी काळात छोट्या कार निर्मितीवर अधिक भर देण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सूचित केले.
एकूणच उलाढाल कमी झाल्यामुळे ग्राहकाकडे मोठ्या कार खरेदी करण्यासाठी पैसे नसतील किंवा असले तरी ते बचत करण्यात मानसिकतेत असू शकतात त्यामुळे आगामी काळात छोट्या कारण अधिक मागणी असण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
मारुती सुझुकी इंडियाच्या देशभरातील अठराशे कार डीलरशिप सुरू झाले आहेत त्यांच्याकडे ग्राहकाकडून छोट्या कारसाठी विचारणा होऊ लागली आहे त्याच बरोबर जे ग्राहक पहिल्यांदा कार खरेदी करणार आहेत ते ग्राहक छोट्या कार पसंद करण्याची शक्यता आहे त्याचबरोबर सध्याच्या अस्थिरतेच्या काळामध्ये ग्राहक नवीन ब्रॅंड खरेदी करण्याच्या ऐवजी जुन्या स्थिर ब्रॅंड ची सुरक्षितता ध्यानात घेतात असे त्यांनी सांगितले.
अशाच प्रकारचे भावना व्यक्त करताना होंडा कार्स इंडिया कंपनीचे उपाध्यक्ष राजेश गोयल यांनी सांगितले की आगामी काळामध्ये सार्वजनिक वाहतुकीला सर्वसामान्य लोक टाळण्याचा प्रयत्न करते लागले त्यांची क्षमता आहे ते लोक कारने प्रवास करण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे आम्ही आशावादी आहोत.
आम्ही यासंदर्भात ग्राहकांचे सर्वेक्षण करीत असून त्या आधारावर मागणी वाढण्याची शक्यता असलेल्या कारचे उत्पादन अधिक प्रमाणात करणार असल्याचे त्यांनी सांगितले तर मोटार कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, रोगराई वाढेल या दृष्टिकोनातून लोक कारचा वापर अधिक करतील असा आम्हाला विश्वास आहे हा प्रकार शहरांतर्गत आणि आंतर शहर वाहतुकीसाठी होऊ शकतो मात्र हे दोन चार महिन्यानंतर ची परिस्थिती असेल सध्यातरी कार विक्री थंडावलेले आहे या क्षेत्रावर गेल्या दोन वर्षापासून अनेक बाबींचा परिणाम झाला असल्याचे त्यांनी सांगितले.