नवी दिल्ली, दि. 26 – देशातील 14 कोटी 19 लाख लोकांना करोनाची लस देण्यात आली आहे, अशी माहिती आज आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली आहे. या मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार देशातील 92 लाख 98 हजार 92 आरोग्य कर्मचाऱ्यांना आतापर्यंत या लसीचा पहिला डोस देण्यात आला असून त्यातील 60 लाख 8 हजार 236 जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.
देशातील फ्रंटलाईन वर्कर या वर्गवारीत येणाऱ्या एकूण 1 कोटी 19 लाख 87 हजार 192 जणांना करोनाचा पहिला डोस देण्यात आला असून त्यातील 63 लाख 10 हजार 273 जणांना दुसरा डोसही देण्यात आला आहे.
60 वर्षांच्यावरील 4 कोटी 98 लाख 72 हजार 209 नागरिकांना ही लस देण्यात आली असून त्यातील 79 लाख 23 हजार 295 जणांना दुसरा डोसही देण्यात आला आहे.