जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील दोन खेळाडूंना करोनाची बाधा झाल्याचे दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने सांगितले आहे. मात्र, या खेळाडूंची नावे जाहीर करण्यास नकार देण्यात आला आहे. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू मंडळाने आयोजित केलेल्या सांस्कृतिक शिबिरात सहभागी होऊ शकणार नसल्याचेही मंडळाने स्पष्ट केले आहे.
या शिबिरात सहभागी झालेले खेळाडू व सपोर्ट स्टाफ अशा एकूण 50 जणांची करोना चाचणी घेण्यात आली होती. त्यात दोन खेळाडू पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या खेळाडूंना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.