औंध- बाणेर भागात 19 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र
पुणे – शहरात करोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असून मागील वर्षी शहरातील झोपडपट्ट्यांना विळखा घालणाऱ्या करोनाने यावेळी शहरातील मोठ्या सोसायट्यांत पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. शहरात अवघ्या दोन आठवड्यात तब्बल 121 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र घोषीत करण्यात आली असून त्यात, जवळपास 95 टक्के मोठ्या सोसायट्या तसेच इमारती आहेत. त्यात, सर्वाधिक 19 प्रतिबंधित क्षेत्र औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहेत.
करोना रुग्णांचा आकडा शहरात 10 फेब्रुवारीपासून झपाट्याने वाढत असून अवघ्या महिन्याभरातच शहरातील सक्रीय बाधितांचा आकडा 11 हजारांच्यावर गेला आहे. रुग्णवाढ झोपडपट्ट्यांच्या तुलनेत सोसायट्यांमध्ये सर्वाधिक आहे. त्यातही प्रामुख्याने औंध-बाणेर, हडपसर, कोथरूड तसेच सिंहगड रस्ता परिसरातील मोठ्या सोसायट्यांमध्ये सर्वाधिक रुग्णवाढ आढळून येत आहे. 20 पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या सोसायट्या तर 5 पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या इमारती सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र घोषीत करण्यात आल्या आहेत.
क्षेत्रीय कार्यालय निहाय प्रतिबंधित क्षेत्र…
औंध-बाणेर – 19, कसबा- विश्रामबाग – 9, कोंढवा- येवलेवाडी – 11 , कोथरूड- बावधन -14, ढोले-पाटील रस्ता – 2, धनकवडी-सहकारनगर – 13, नगर रस्ता- 3 , बिबवेवाडी 10, वानवडी- रामटेकडी – 6, वारजे-कर्वेनगर – 4, शिवाजीनगर- घोले रस्ता – 9, सिंहगड रस्ता – 9, हडपसर मुंढवा 7