पुण्यात नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दोन्ही रुग्णांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही माहिती मिळताच, रात्री उशिरा पर्यंत महापालिकेची आरोग्य यंत्रनेच्या बैठका सुरू होत्या. तसेच रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यकतीचा शोधही आरोग्य विभागाने सुरू केला आहे.
दरम्यान, आरोग्य यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
50 वर्षीय पुरुष आणि 40 वर्षीय महिला असलेले दांपत्य 24 फेब्रुवारीला दुबई येथे फिरण्यासाठी गेले होते. त्यानंतर 1 मार्चला ते पुण्यात परतले. त्यातील एकाला कोरोना सदृश लक्षणे दिसल्याने नायडू रुगणालायत उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या कुटूंबातील दोघांनाही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नायडू रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे. हे दांपत्य सिंहगड रस्ता परिसरातील असल्याची प्राथमिक आहे.दरम्यान, जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि राज्याच्या आरोग्य विभागाने रात्री 3 पर्यंत या सर्व प्रकरणी आवश्यक त्या खबरदारी साठी बैठका घेतल्या आहेत. या साथीला अटकाव करण्यासाठी तसेच गर्दी टाळण्यासाठी मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.