सातारा -जिल्ह्यात मंगळवारी (दि. 13) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार 354 नागरिकांना करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. गेल्या दहा-बारा दिवसांत बाधितांच्या प्रमाणात सातत्याने घट होत असली तरी गेल्या 24 तासांत करोनाबळींची संख्या पुन्हा वाढली. त्यामुळे जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्ह्यात करोनाबाधितांची एकूण संख्या 42 हजार 430 झाली आहे.
सातारा तालुक्यामध्ये सातारा शहरात शनिवार पेठ सहा, सदरबझार चार, गुरुवार पेठ, पंताचा गोट, गोडोली प्रत्येकी तीन, रविवार पेठ, शाहूनगर प्रत्येकी दोन, मल्हार पेठ, बुधवार पेठ प्रत्येकी एक, इतरत्र आठ, तामाजाईनगर 14, नागठाणे आठ, सैदापूर, वाढे प्रत्येकी चार, शाहूपुरी, देगाव प्रत्येकी तीन, करंजे, गडकर आळी, दरे, देगाव फाटा, विलासपूर प्रत्येकी दोन, कोडोली, चिंचणेर वंदन, काशीळ, आवर्डे, प्रतापसिंहनगर, कोंडवे, कळंबे, सोनगाव, वर्णे, मोळाचा ओढा, वेळेकामथी प्रत्येकी एक, कराड तालुक्यामध्ये कराड शहरात विद्यानगर चार, सोमवार पेठ दोन, मंगळवार पेठ, बैल बाजार प्रत्येकी एक, इतरत्र दोन,
मलकापूर, शेणोली प्रत्येकी सहा, वडगाव हवेली पाच, येणके, काले, सारुड, येणपे प्रत्येकी चार, आगाशिवनगर, कोयना वसाहत प्रत्येकी तीन, गोटे, पार्ले, कार्वे, शेरे प्रत्येकी दोन, कालवडे, हिंगणगाव बुद्रुक, पोतले, घोगाव, मुंढे, म्हासोली, चरेगाव, आटके, कोपर्डे हवेली, कोर्टी, उंडाळे प्रत्येकी एक, फलटण तालुक्यामध्ये फलटण शहरात मलठण दोन, शुक्रवार पेठ एक, कापशी चार, फडतरवाडी तीन, तडवळे, साखरवाडी प्रत्येकी दोन, विडणी, साठे फाटा, तरडगाव, नागेश्वरनगर, झिरपवाडी, बरड, कोळकी, मुरुम, कापडगाव, हिंगणगाव बुद्रुक प्रत्येकी एक, वाई तालुक्यामध्ये वाई शहरात विराटनगर, गंगापुरी प्रत्येकी तीन, यशवंतनगर दोन, सिद्धनाथवाडी, धर्मपुरी प्रत्येकी एक, दरेवाडी दोन, ओझर्डे, केंजळ, पसरणी, निकमवाडी, कवठे, मेणवली, बोपर्डी, खानापूर, चिंधवली प्रत्येकी एक, पाटण तालुक्यामध्ये मालदन, कुंभारगाव, त्रिपुडी,
कालगाव प्रत्येकी दोन, सणबूर, निवडे, निरवळे, टोळेवाडी प्रत्येकी एक, खंडाळा तालुक्यात खेड बुद्रुक सात, बोरी पाच, अहिरे दोन, भादवडे, भादे, शिरवळ, बावडा, शिंदेवाडी, लोणंद प्रत्येकी एक, महाबळेश्वर तालुक्यात भिलार, पागचणी प्रत्येकी एक, खटाव तालुक्यात वडूज सहा, गणेशवाडी पाच, खटाव, सातेवाडी प्रत्येकी तीन, औंध दोन, त्रिमली, कातरखटाव, जांभ, जाखणगाव, पुसेगाव, कुरोली, विखळे, तुपेवाडी, उंबर्डे प्रत्येकी एक, माण तालुक्यात म्हसवड, भवानवाडी प्रत्येकी तीन, मार्डी, बिजवडी प्रत्येकी दोन, मार्डी, मलवडी, दहिवडी, गोंदवले बुद्रुक, लोधवडे, वडगाव, पळशी,
वरकुटे मलवडी, विरळी, वीरकरवाडी प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्यात कोरेगाव, रहिमतपूर प्रत्येकी चार, तारगाव, सासुर्वे प्रत्येकी दोन, सातारारोड, नागझरी, पिंपोडे बुद्रुक, आसनगाव, एकंबे, सांगवी, खेड, ल्हासुर्णे, शिरढोण, बोरगाव, भक्तवडी प्रत्येकी एक, जावळी तालुक्यात कुडाळ 11, मोरावळे चार, भोगवली तीन, गवडी, पाडेगाव प्रत्येकी दोन, म्हाते बुद्रुक, करवडी, शिंदेनगर, इतरत्र प्रत्येकी एक, बाहेरील जिल्ह्यांमधील सांगली चार, सोलापूर दोन, पुणे एक, असे 354 अहवाल बाधित आले आहेत.