गाझीपूर ( corona death bodies in ganga ) – बिहारच्या बक्सरमध्ये गंगेच्या बाजूला 110 पेक्षा जास्त मृतदेह सापडल्यानंतर देशात एकच खळबळ उडाली होती. याच मुद्दयावरून बिहार आणि उत्तर प्रदेश सरकार एकमेकांच्या समोर उभे टाकले असल्याचे दिसत आहे.
उत्तर प्रदेशातील गाझीपूरवरून वाहत येणारे मृतदेह रोखण्यासाठी बक्सर प्रशासनाने गंगेमध्ये एक जाळे लावले आहे. तर दुसरीकडे, गाझीपूर प्रशासनाने बिहारवरून आलेल्या मृतदेहांना गाझीपूर सीमेवरुन माघारी पाठवण्यास सुरुवात केली आहे.
अशातच आता गाझीपूर प्रशासनाने नागरिकांनी मृतदेह गंगेमध्ये विसर्जित करू नयेत यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये पोलीस कर्मचारी नदीपात्रामध्ये एका नावेवर बसून स्थानिकांना गंगेच्या पाण्यामध्ये मृतदेह विसर्जित करू नका अशी सूचना देतायेत.
तसेच बाहेरून येऊन कोणी मृतदेह पाण्यात विसर्जित करत असेल तर त्याबाबतची माहिती पोलीस प्रशासनास देण्यात यावी असं आवाहनही पोलिसांमार्फत करण्यात आलंय.
अंतिम संस्कारासाठी पैसे नसल्यास आमच्याशी संपर्क साधा
दरम्यान, अंतिम संस्कारासाठी लागणार खर्च पेलत नसल्याने काही नागरिकांकडून मृतदेह नदीमध्ये विसर्जित करण्यात येत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यानंतर प्रशासनाला जाग आली असून अशा नागरिकांना स्वयंसेवी संस्था व पोलीस प्रशासनातर्फे अंतिम संस्कारासाठी मदत देण्यात येईल अशी घोषणा पोलिसांतर्फे करण्यात आली.
#WATCH | Ghazipur: A police official makes announcement — “Please do not perform water burial of bodies into Ganga river, but cremate them. If any person is unable to bear expenses of cremation, please inform us. We will make arrangements.” pic.twitter.com/cfdQrg7CTo
— ANI UP (@ANINewsUP) May 14, 2021
अंत्यविधीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती नियंत्रित
एकीकडे करोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले असून दुसरीकडे लॉक डाऊनमुळे अर्थचक्रही ठप्प झाले आहे. यामुळे काहींना आपल्या नातेवाईकांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणार खर्च देखील पेलवत नाहीये. अशा परिस्थितीत अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या सामग्रीची विक्री चढ्या भावाने होऊ नये म्हणून गाझीपूर प्रशासनाने पावलं उचलली आहेत. येथे अंत्यविधीसाठी लागणाऱ्या लाकडाचा भाव ६५० रुपये प्रति क्विंटल इतका नियंत्रित ठेवण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम पी सिंग यांनी दिली.
Ghazipur administration has capped price of firewood at Rs 650/quintal & ‘dom raja’ would not take more than Rs 500 for cremating a body. We’re setting up a control room at each crematorium where police personnel & lekhpal would be stationed: Ghazipur DM MP Singh (1/2) pic.twitter.com/0g0JD6dn1s
— ANI UP (@ANINewsUP) May 14, 2021