सोलापूरचे पाणी दुसऱ्या कोणालाही मिळणार नाही, सोलापूरकरांनी निर्धास्त राहावे – जयंत पाटील

पुणे – सोलापूरकरांवर आम्ही अजिबात अन्याय होऊ देणार नाही, सोलापूरचे पाणी दुसऱ्या कोणालाही मिळणार नाही याबाबत सोलापूरकरांनी निर्धास्त राहावे, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

या प्रश्नांसंदर्भात आवश्यक बैठका सोलापूरचे पालकमंत्री  दत्तात्रय भरणे घेत आहेत. याबाबत इंदापूर तालुक्यातील लोकांचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न  दत्तात्रय भरणे यांनी केला होता. याचा अर्थ सोलापूरकरांवर अन्याय होणार असे अजिबात नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.