Corona – राजधानी दिल्लीत करोनाचे रोज नवीन तीन ते चार रूग्ण आढळून येत असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री संजय भारद्वाज यांनी दिली आहे. मात्र स्थितीची मुकाबला करण्याची आमची पूर्ण तयारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, देशभरात रविवारपर्यंत करोनाचा नवा व्हेरियंट जेएन.१ चे ६३ नवीन रूग्ण आढळून आले आहेत. यात सगळ्यांत जास्त ३४ रूग्ण गोव्यात आढळले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणा अशा प्रत्येक राज्यांत नव्या व्हेरियंटचे रूग्ण आढळत आहेत. मात्र ही संख्या अद्याप एक आकडीच आहे.
दरम्यान, दिल्लीतील स्थितीबाबत बोलताना सौरभ भारद्वाज म्हणाले की, ‘आमची केंद्र सरकारसोबत बैठक झाली आहे. त्यात आम्हाला असे सांगण्यात आले की केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक या दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये रूग्णसंख्या वाढते आहे. आम्हीही रोज तपासण्यात करत रोज सरासरी तीन ते चार रूग्ण आढळत आहेत. आम्ही मॉक ड्रील केले असून सर्व आवश्यक तयारीही केली आहे.
दरम्यान, देशभरात करोनाचे नवे ६२८ रूग्ण आढळून आले असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी म्हटले होते. तसेच ४०५४ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती सोमवारी देण्यात आली होती.