Corona – जगभरातील हजारो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला करोना ( Corona )अजुनही चिंतेचा विषय बनला आहे. भारतात आता थंडीची जेमतेम सुरूवातच झाली असताना करोनाची लागण झालेल्या काही केसेस समोर आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सतर्क होण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार देशभरात १४८ जणांना करोनाची नव्याने लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी याबाबतच्या ज्या अपडेटस् दिल्या त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
या ताज्या आकडेवारीमुळे देशात आतापर्यंत करोनाची लागण झालेल्यांची संख्या ४ कोटी ५० लाख २ हजार ८८९ झाली आहे. तर करोनामुळे आतापर्यंत ५ लाख ३३ हजार ३०६ जणांचा मृत्यू झाला आहे. ४ कोटी ४४ लाख ६८ हजार ७७५ रूग्ण उपचार करून
बरे झाले आहेत.
करोना पूर्ण आटोक्यात आले असतानाच चीनमध्ये न्यूमोनियाचा उद्रेक झाला असून त्याबाबत फारशी अधिकृत माहिती दिली गेलेली नाही. तेथील काही भागांतील सर्व रूग्णालये या आजाराने संक्रमित झालेल्या मुलांनी भरलेली आहेत. त्या पाश्र्वभूमीवर भारतातही सतर्कतेचा इशारा काही दिवसांपूर्वी देण्यात आला आहे.