तिरुपती – राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव, ( Lalu Prasad Yadav ) त्यांची पत्नी राबडी देवी, मुलगा तेजस्वी यादव ( Tejasvi yadav ) आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शनिवारी आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यादव कुटुंबाने मंदिरातील सुप्रभातम सेवेत भाग घेतला. ही सेवा पहाटे केली जाते. ( Tirupati balaji temple )
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले की, आम्ही आमच्या कुटुंबासह, माझी आई, वडील, माझी पत्नी, भाऊ, आणि माझी मुलगी, कात्यायनी भगवान बालाजीचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो होतो. माझ्या मुलीचा मुंडण सोहळा पार पडला. आम्ही सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. देश पुढे जावो आणि प्रत्येकजण समृद्ध होवो अशी प्रार्थना आम्ही केली. ( Yadav family balaji temple )
आज तेजस्वी यादव यांच्या लग्नाचाही वाढदिवस आहे. हे निमित्त साधून त्यांनी हे देवदर्शन केले. अध्यात्मिक स्थळांच्या भेटीची आपली जुनी आवड आहे असे सांगताना तेजस्वी यादव म्हणाले, सकारात्मक ऊर्जा देणार्या पौराणिक, ऐतिहासिक आणि अध्यात्मिक ठिकाणांचा प्रवास म्हणजे ज्ञान, दैवी कृपा, आध्यात्मिक शांती, आत्मसाक्षात्कार,आणि देवाशी संपर्क साधण्याचे साधन आहे.
आज सवेरे आंध्र प्रदेश के तिरुमाला पर्वत स्थित उत्कृष्ट शिल्प कौशल के अद्भुत उदाहरण एवं भक्ति, विश्वास और श्रद्धा के प्रतीक भगवान श्री तिरुपति बालाजी मंदिर में सपरिवार पूजा-अर्चना व दिव्य दर्शन कर सकारात्मक ऊर्जा एवं आशीर्वाद प्राप्त किया तथा गर्भगृह में विराजमान भगवान वेंकटेश्वर… pic.twitter.com/dtJhGlxe4s
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) December 9, 2023
लग्नाच्या वाढदिवसाच्या खास दिवशी मुलीचे मुंडन
उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सोशल मीडियावर लिहिले की, आज सकाळी आंध्रमधील तिरुमला पर्वतावर असलेल्या भगवान श्री तिरुपती बालाजी मंदिरात भक्तीभावाने कुटुंबासह पूजा करून दर्शन घेतले. यावेळी गर्भगृहात उपस्थित भगवान व्यंकटेश्वराला राज्यातील सर्व जनतेच्या सुख, शांती, समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली. आज लग्नाच्या वाढदिवसाच्या विशेष दिवशी कन्या कात्यायनी हिचे मुंडन संस्कारही करण्यात आले.