पुणे– लष्कराच्या व्हेईकल मेकॅनिकल परिक्षेत अंडरविअरमध्ये मोबाईल आणि पेनमध्ये इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस ठेऊन कॉपी करणाऱ्या एका तरुणास विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून मोबाईल आणि डिव्हाईस जप्त करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी धानोरी येथील बी.आर.ओ.स्कुल ऍण्ड सेंटर येथे घडली.
दिपचंद करमबिर (हरियाणा) असे कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे . याप्रकरणी अस्स्टिंट ऍडमिन ऑफिसर अरुणकुमार एस.व्ही.(46) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अंतर्गत ग्रीन बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या वतीने देशाच्या सीमेवर रस्ते तयार करण्याचे काम केले जाते. यासाठी व्हेईकल मेकॅनिकच्या पोस्टसाठी शुक्रवारी लेखी परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातून आलेल्या परिक्षार्थींना सकाळी सातच्या सुमारास बी.आर.ओ.स्कुल ऍण्ड सेंटर मध्ये प्रवेश देण्यात आला.
यानंतर हॉल तिकीट तपासून त्यांना परिक्षा केंद्रात सोडण्यात आले. परिक्षा सकाळी साडेदहाच्या सुमारास सुरु झाली. तेव्हा वर्ग खोली क्रमांक तीनमधील प्रिसायडिंग ऑफिसर मेजर एस.के. साहू यांना दिपचंद करमबिर सारखे खाली बघत असताना दिसून आला. त्यांना संशय आल्याने त्यांनी त्याची अगंझडती घेतली. तेव्हा त्याच्या पेनच्या कॅपमध्ये एक इलेक्टॉनिक्स डिव्हाईस आणि अंडरविअरमध्ये सॅमसंग कंपनीचा मोबाईल सापडला. याच्यामाध्यमातून तो परिक्षेत आलेले प्रश्न सांगून त्याची उत्तरे जाणून घेत होता.