मुंबई – कॉमेडियन कपिल शर्माने “झ्विगाटो’ या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वांना आश्चर्यचकित केले. प्रेक्षक आणि समीक्षकांकडून प्रशंसा मिळाल्यानंतर, झ्विगाटोला आता अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या विशेष संग्रहाच्या लायब्ररीमध्ये स्थान मिळाले आहे. होय… कपिल शर्माच्या झ्विगाटो या चित्रपटाला ‘ऑस्कर’ लायब्ररीत स्थान मिळाले आहे. दुसरीकडे झ्विगाटोला ऑस्करमध्ये विशेष स्थान मिळताच या चित्रपटाच्या दिग्दर्शिका आणि सहलेखिका नंदिता दास यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.
झ्वीगाटोला ऑस्कर लायब्ररीत स्थान मिळाल्यानंतर नंदिता दास यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. नंदिताने पोस्टमध्ये लिहिले.., ‘मला अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस (ऑस्कर) कडून एक ईमेल आला तेव्हा मला सर्वात आश्चर्य आणि आनंद झाला की ते त्यांच्या कायमस्वरूपी कोर-कलेक्शनमध्ये झ्विगाटोच्या स्क्रिप्टला स्थान देत आहेत. ही एक आनंदाची आठवण आहे, याबद्दल मी आभारी आहे…’ असं नंदिता दास म्हणाली आहे.
अभिनेत्री आणि दिग्दर्शिका नंदिता दास दिग्दर्शित ‘झ्विगाटो’ या चित्रपटात कपिल शर्माने मुख्य भूमिका साकारली आहे. कपिल शर्मानेही पात्राला न्याय देण्यासाठी आपलं वजन देखील वाढवले आहे. इतकंच नाही तर त्याने या चित्रपटासाठी वापरलेली भाषाही वेगळी आहे. या चित्रपट तो एका डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत असल्याचं दिसत आहे. या सोबतच कपिल शर्माच्यासोबत अभिनेत्री शहाना गोस्वामी हिने सुद्धा मुख्य भूमिका साकारली आहे.