नवी दिल्ली – बस कंडक्टर आणि एका प्रवासी महिलेमध्ये झालेल्या एका वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. यावेळी प्रवासी महिला बस कंडक्टरला त्याची टोपी आणि धर्माबाबत बोलत असल्याचे समजते. यावेळी महिलेने कंडक्टरला ‘तुम्ही धर्म पाळताय असं दाखवायचं असेल तर तुमच्या घरी किंवा मशिदीमध्ये दाखवा’ असं सुनावल्याचे समजते.
बंगळूरमधील हा सर्व प्रकार असून याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ड्युटीवर असताना बस कंडक्टरने मुस्लिम स्कल कॅप घातली होती. अशा स्थितीत गणवेशासह टोपी घालण्यास महिलेने आक्षेप घेतला. महिलेने कंडक्टरला विचारले की तुम्हाला गणवेशासह हि टोपी घालण्याची परवानगी आहे का ? ही टोपी तुमच्या ड्रेस कोडचा भाग आहे का? कंडक्टरने उत्तर दिले की तो टोपी अनेक वर्षांपासून घालत आहे आणि यापूर्वी कोणीही आक्षेप घेतला नव्हता.
यावर ही महिला घरात किंवा मशिदीत आपला धर्म पाळा, असे सांगते. तसेच सरकारी कर्मचारी ड्युटीवर असताना टोपी घालू शकत नाही, असेही म्हणते. यानंतर दोघांमध्ये चांगलाच वाद होतो. अखेर कंडक्टर ही टोपी काढताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.
ವಾಟ್ಸಾಪಲ್ಲಿ ನೋಡ್ದೆ. ಆ ಮಹಿಳೆಯ ಹೃದಯದಲ್ಲಿ ತುಂಬಿದ ಕೋಮು ವಿಷದ ತೀವ್ರತೆಯನ್ನು ಅಳೆಯುವ ಯಂತ್ರವೊಂದಿದ್ರೆ ಅದರ ಮುಳ್ಳುಗಳೇ ಒಡೆದುಹೋಗುತ್ತಿದ್ವೆನೋ?. ಕುಂಕುಮ, ಮಾಲೆಗಳನ್ನು ಧರಿಸುವಂತೆ ಟೋಪಿಗೂ ಅವಕಾಶವಿದೆಎಂದಾಗಿದೆ ನನ್ನ ಭಾವನೆ. ಏನಿದ್ದರೂ ವಿಷ ಕಾರುತ್ತಿರುವ ಮಹಿಳೆಯ ಮುಂದೆಯೂ ಸೌಮ್ಯವಾಗಿ ನಡೆದುಕೊಂಡ ನಿರ್ವಾಹಕರಿಗೆ ನನ್ನದೊಂದು ಸಲಾಂ pic.twitter.com/RFaIXGuq3M
— Mohamed Haneef (@Mohamed47623244) July 11, 2023
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी महिलेवर चांगलीच टीका केली आहे. अनेकांनी हे योग्य नसल्याचे म्हंटले आहे. तर काहींनी यासाठी महिलेचे समर्थन देखील केले आहे. मात्र सध्या हा विषय सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा ठरत आहे.