कोल्हापूर – कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरातील राजश्री शाहू विद्यामंदिरातील मतदान केंद्रावरती वादावादीचा प्रकार घडला आहे. मतदार स्लीपवर खाडाखोड झाल्याने ही वादावादी झाली आहे. मतदान करण्यासाठी आलेला मतदाराचे नाव हे मतदार यादीत सापडले नसल्यामुळे मतदारांनी या ठिकाणी केंद्रध्यक्षांशी वाद घातला आहे.
आम्ही सकाळपासून याठिकाणी फिरत आहे आम्हाला कोणीही माहिती देत नाही आमचं मतदार यादीत नाव आहे का नाही हे सांगा व सकाळी सात वाजल्यापासून मी या ठिकाणी फिरत आहे तुमची जबाबदारी आहे की नाही अशा पद्धतीने या ठिकाणी नागरिकाने वाद घातला आहे.