बंगलोर – काँग्रेसच्या एका नेत्याचे महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य समोर आले आहे. कर्नाटकमध्ये भाजपला घेरण्यासाठी पक्षाचे आमदार प्रियांक खर्गे यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
Character assassination of women by Cong’s senior leader @kharge‘s son @PriyankKharge who is a spokesman of Cong in K’taka & MLA from Chittapur is very shocking & raises serious question over the mentality of Cong leaders.@NCWIndia pls take note of it.https://t.co/5WeDFAfYgh pic.twitter.com/8RJY8hHhpl
— Sakthivel Arumugam (@SakthivelHGH) August 13, 2022
भाजपवर निशाणा साधत खर्गे म्हणाले की, ‘राज्यात सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी तरुणींना पुरुषांना लाच द्यावी लागते. ते म्हणाले की, कर्नाटकात सरकारी नोकरीसाठी महिलांना कुणासोबत तरी झोपावे लागते.’
दरम्यान, कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते खरगे यांनीही भरती घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी किंवा विशेष तपास पथक (एसआयटी) चौकशीची मागणी केली. सरकारने जलदगती न्यायालय स्थापन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. विविध पदांच्या भरतीत भाजपवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही खर्गे यांनी केला. “सरकारने पदे विकण्याचा निर्णय घेतला आहे. तरुणींना सरकारी नोकऱ्या हव्या असतील तर त्यांना कोणाकोणासोबत झोपावे लागते. तर पुरुषांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी लाच द्यावी लागते. मात्र, घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला.’ असंही ते म्हणाले आहे.