मुंबई – मुंबईत झालेल्या क्रूझ पार्टीमध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. त्यानंतर चर्चेत आलेले अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्यात झालेला संघर्ष अवघ्या महाराष्ट्रासह देशाने पाहिला. वानखेडे यांना जात पडताळणी समितीने क्लीन चिट दिल्याचे आता समोर आले आहे.
अधिकारी समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यात झालेला संघर्ष थेट न्यायालयात पोहचला होता. मलिक यांनी वानखेडे हे मुस्लिम असल्याचे सांगत त्या बाबतचे काही पुरावे देखील समोर आणले होते. नवाब मलिक हे सध्या गोवावाला केसप्रकरणी जेलमध्ये आहेत. परंतु जात पडताळणी समितीने दिलेला निर्णय हा मलिकांसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना जात पडताळणी समितीने क्लीन चिट दिली आहे. वानखेडे हे जन्माने मुस्लिम नव्हते, असे आदेशात म्हटले आहे. त्यासोबतच असेही नमूद केले आहे की वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला हे सिद्ध झालेले नाही परंतु ते महार -37 अनुसूचित जातीचे होते हे सिद्ध झाले आहे.
Caste scrutiny committee gives clean chit to ex-NCB Zonal Director Sameer Wankhede. The order reads that Wankhede wasn’t a Muslim by birth; also states that it’s not proven that Wankhede&his father converted to Islam but it’s proven that they belonged to Mahar -37 Scheduled Caste pic.twitter.com/XcOEcKvB8d
— ANI (@ANI) August 13, 2022
नवाब मलिक यांनी आक्रमक होत समीर वानखेडे यांचे जात प्रकरण सतत मीडियात लावून धरले होते. आता वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे, मलिक हे देखील सध्या जेलमध्ये आहेत.