Congress Election – काँग्रेसने नुकतंच मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश या राज्यांसह इतरांसह आठ राज्यांसाठी निवडणूक समित्यांची स्थापना केली आहे. या समित्यांवर त्यात्या राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या एकूणच कामकाजचा भार राहणार आहे. समितीच्या स्थापनेच्या प्रस्तावाला पक्षाच्या मध्यवीवर्ती निवडणूक समितीने तात्काळ मंजुरी दिली आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांची दक्षिणेकडील प्रदेश निवडणूक समितीचे अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली, तर जितू पटवारी आणि गोविंद सिंग दोतासारा हे अनुक्रमे मध्य प्रदेश आणि राजस्थानसाठी प्रदेश निवडणूक समितीचे अध्यक्ष असतील.
अशोक गेहलोत आणि माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट आणि जितेंद्र सिंह महेंद्रजीत सिंग मालवीय, मोहन प्रकाश, सी पी जोशी, हरीश चौधरी, रामलाल जाट, प्रमोद जैन भय्या, प्रताप सिंग खाचरियावास,
ममता भूपेश, भजन लाल जाटव, मुरारी लाल मीना, अशोक चंदना, नीरज डांगी, जुबेर खान, धीरज शर्मा, राजकुमार गुर्जर, रोहित बोहरा, इंद्र मीना, डुंगर राम गेडार, शिमला देवी नायक आणि ललित यादव आदिंची या समितीत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
याआधी काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एक सेंट्रल वॉर रूम स्थापन केली ज्यामध्ये संघटनात्मक वॉर रूम आणि कम्युनिकेशन वॉर रूम यांचा समावेश आहे. संघटनात्मक वॉर रूमचे नेतृत्व शशिकांत सेंथिल एस यांच्याकडे असेल.
त्यात गोकुळ बुटेल, नवीन शर्मा, वरुण संतोष, कॅप्टन अरविंद कुमार हे चार उपाध्यक्ष असतील. वैभव वालिया यांना कम्युनिकेशन वॉर रूमचे अध्यक्ष करण्यात आले आहे. तसेच पक्षाने प्रचार समितीही स्थापन केली आहे.