NZ vs SA Test Series 2024 : ‘हे’ असेच सुरु राहीले तर कसोटी क्रिकेट संपून जाईल – स्टीव्ह वॉ

सिडनी – भारताविरुद्धची मालिका पार पडल्यानंतर आता दक्षिण आफ्रिका संघ न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने जाहीर केलेला संघ पाहता त्यांनी अत्यंत कमकुवत संघ पाठवण्याचे निश्चित केले आहे. असे घडत राहीले तर येत्या काळात कसोटी क्रिकेटमधील रंगतच निघून जाईल व कसोटी क्रिकेटला धोका उत्पन्न होइल, असा इशारा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याने दिला आहे.
सध्या अनेक संघ हेच करत आहेत की कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंड व ऑस्ट्रेलिया वगळता अन्य सर्व संघ अगदी भारतीय संघही कमकुवत संघ पाठवतात हे दिसत आहे. त्यांचे काही प्रमुख खेळाडू आयत्यावेळी माघार घेतात. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही भारतीय संघातील काही प्रमुख खेळाडू विश्रांतीवर आहेत. हे असेच सुरु राहीले तर कसोटी क्रिकेटच संपून जाईल, असा धोकाही त्याने व्यक्त केला.
दरम्यान, केपटाऊनमध्ये नुकताच झालेला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कसोटी सामना जिंकून भारताने इतिहास रचला. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने यजमान संघाचा सात गडी राखून पराभव केला. सेंच्युरियनमधील पहिली कसोटी एक डाव आणि 32 धावांनी जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 अशी अभेद्य आघाडी घेतली होती. त्यानंतर भारताने दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करत मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली होती.





