शिरूर (प्रतिनिधी) – शिरूर शहरात करोना रुग्णाच्या संपर्कात आलेले 44 पैकी 44 जणांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी तुषार पाटील यांनी दिली आहे. यात शिरुर शहरातील दोन हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर्ससह कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने शिरुर शहराला मोठा दिलासा मिळाला आहे.
तर आणखी मुंबई येथून आलेल्या दोघांचे एक महिला, एक पुरुष यांचेअहवाल येणे बाकी होते. त्यांचेही आज करोना अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे वैद्यकीय अधीक्षक यांनी सांगितले.
शिरूर शहरातील दोन हॉस्पिटलच्या व डायग्नोस्टिक सेंटरच्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने हॉस्पिटलशी संबंधित असणाऱ्या रुग्णांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. शिरूर शहरातील प्रीतम प्रकाश नगर अण्णापुर येथील रुग्णाच्या संपर्कात हे सर्व शिरूर शहरातील 44 जण आले होते. त्यातील 44 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
या रुग्णांच्या तपासणी अहवाल तपासणीसाठी पाठवला पासून शिरूर शहरांमध्ये नागरिकांमध्ये मोठी धाकधूक होती , काल 3 जून पर्यंत 42 जणांचे अहवाल प्राप्त झाली होते. त्यामुळे हे मुंबईवरून आलेल्या चार जणांपैकी दोघा जणांचे अहवाल येणे बाकी होते येण्यास उशीर होत असल्याने शहरात संभ्रम अवस्था मुंबईतील दोघाही जणांचे अहवाल आज निगेटिव आले आहे. यामुळे नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे.
शिरूर शहरातील 44 नागरिकांचे करोना आज निगेटिव्ह आल्याने शहराच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट असली, तरिही नागरिकांनी आपल्या जवळपास आपल्या घरी कोणी हॉटस्पॉट मधील नातेवाईक, मित्र आले असतील तर त्याची माहिती नगर परिषद पोलीस स्टेशन किंवा शिरूर ग्रामीण रुग्णालयांना कळवावी.
– महेश रोकडे मुख्याधिकारी शिरूर नगर परिषद