धनबाद- यंदाची लोकसभा निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी अतिश महत्वाची आहे. यासाठी सर्वच पक्षांनी नवनवीन फंडे प्रचारासाठी वापरले आहे. काँग्रेसने प्रचारासाठी आपले ‘मैं ही तो हिंदुस्तान हूं’ हे गीत तयार केले असून ठिकठिकाणी जाहिरातींमध्ये ते वापरले जात आहे. मात्र, काँग्रेसचे हे गीत कॉपीराईटच्या वादात सापडले आहे.
दरम्यान, धनबाद येथील एका निवृत्त कर्नलच्या पत्नीने या गीताचे बोल आपल्या पतीच्या कवितेतील असल्याचा दावा केला आहे. यासंबंधी तिने काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना खुले पत्र सुद्धा लिहिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जे के सिंह यांनी ‘मैं सारा हिंदुस्तान हूं’ हा कवितासंग्रह लिहिला असून, हे गीत याच कविता संग्रहातून प्रेरित आहे. जर कांग्रेसला हे गीत पुढेही दाखवायचे असल्यास त्यांनी याबाबदचे आपले संमतीपत्र घ्यावे. हा प्रकार कॉपी राईटचे उल्लंघन करणारा आहे.