साकळाई योजनेला विधानसभेपूर्वी मान्यता देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंचन योजनांसाठी मोठा निधी दिला
सामान्य माणसांच्या जिवनात बदल
वाळकी येथे विखे यांची प्रचारसभा

बारामती मतदार संघही अडचणीत आहे – पाचपुते

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर यावेळी टीका केली. ते म्हणाले, कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात मी पाण्यासाठी संघर्ष केला. राज्यात 11 मराठा मुख्यमंत्री झाले. त्यांना साधा मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सोडवता आला नाही. राज्यातल्या विधिमंडळामध्ये तीन जगताप आमदार आहेत. कोणीही पाच मिनिटांपेक्षा जास्त बोलले नाही.

नगर – तुमच्या मनात जे आहे ते माझ्या ध्यानात आहे. यासाठीच मी वाळकी येथे आलेलो आहे. साकळाई पाणी योजनेचा प्रश्‍न 25 वर्षांपूर्वीचा आहे. जे कॉंग्रेस राष्ट्रवादीला सत्तेत असताना जमले नाही, ते काम मी साडेचार वर्षांत करून दाखवले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी साकळाईच्या योजनेला मंजुरी देणार असल्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री द्रेवेंद्र फडणवीस यांनी दिले.

वाळकी तालुका नगर येथे भारतीय जनता पक्ष, शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजीराव कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे डॉ. सुजय विखे, माजी मंत्री बबनराव पाचपुते माजी आमदार अनिल राठोड भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे, जिल्हा परिषद माजी सदस्य बाळासाहेब हराळ, अभिनेत्री दीपाली सय्यद, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर, भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग, शिवसेना तालुकाध्यक्ष राजेंद्र भगत, सुवेद्र गांधी, बाळासाहेब पोटघन, रमाकांत बोठे सर, वाळकी गावचे सरपंच स्वाती बोठे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, साकळाई योजनेचे काम आम्हीच करणार आहोत. सिंचनाचा प्रश्‍न सरकारने चार वर्षात सोडवला. कुकडी धरणाच्या फेरतपासणीसाठी व बोगद्यासाठी 3900 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. हा बोगदा झाल्यानंतर साकळाई योजनेसाठी विजेची गरज भासणार होती. यासाठी सोलर प्रोजेक्‍ट उभा केला जाईल. भाजपा सरकारने देशातील सामान्य माणसाच्या जीवनात बदल केला आहे. मोठ्या शहरांना जोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचे कामे मोठ्या प्रमाणात सुरु केलेलं आहेत. ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी तीस हजार किलोमीटर लांबीचे रस्ते तयार केले आहेत. केंद्र सरकारने राज्यातील सिंचनासाठी 35000 कोटींची मदत केलेली असून, नदीजोड प्रकल्प ही हाती घेतलेला आहे. यावेळी दिलीप भालसिंग, राजेंद्र भगत, सुनील साळवे, प्रा. शशिकांत गाडे, दिपाली सय्यद, बाळासाहेब हराळ, भानुदास बेरड, आ. शिवाजी कर्डिले, खा. दिलीप गांधी यांची भाषणे झाली.

विधानसभा निवडणुकांपूर्वी साकळाई आराखड्याला मंजुरी

साकळाई पाणी योजनेचा प्रश्‍न 25 वर्षापुर्वीचा हा प्रश्‍न आहे. गेल्या पाच वर्षातील आमची कामे पाहा. गेल्या 25 वर्षातील प्रश्‍नच आम्ही सोडवत आहेत. त्यामुळे साकळाईचा प्रश्‍न आम्ही सोडवणारच. विधानसभा निवडणुकीसाठी आम्हाला पुन्हा तुमच्यात यायचे आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांआधी मी साकळाईच्या आराखड्याला मंजुरी देणार असल्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारार्थ नगर तालुक्‍यातील वाळकी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

यावेळी पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले, सेनेचे उपनेते अनिल राठोड, माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, सेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे, जिल्हा परिषद माजी सदस्य बाळासाहेब हराळ, दीपाली सय्यद, समाजसेवक राजाराम भापकर उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, कोणी काहीही म्हणो. गेल्या 25 वर्षातील साकळाई प्रश्‍न विरोधकांनी का सोडला नाही. कर्जत-जामखेडमधील तुकाई आम्हीच केली. साकळाई योजनेमध्ये सुधारणा केली आहे. ओव्हर फ्लोचे पाणी या योजनेतून मिळणार आहे. त्यामुळे कोणाचेही हक्काचे पाणी पळविले जाणार नाही, असेही ते म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.