नवी दिल्ली : आज देशभर कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या निकालांची जोरदार चर्चा सुरु आहे. ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यातच सुरुवातीच्या निडवणुकांच्या कलांमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. या पार्श्वभूमीवर आत मतमोजणीमध्ये सुरुवातीचे कल हाती येताच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांच्या मुलाने मोठा दावा केला आहे.
कर्नाटक विधानसभेच्या मतमोजणीच्या पहिल्या काही तासांमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले. या कलांच्या आकडेवारीवर सिद्धरामय्या यांचे पुत्र यतिद्र सिद्धरामय्या यांनी मोठा दावा केला आहे. यतिंद्र सिद्धरामय्या यांनी त्यांचे वडील राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असायला हवेत, असा दावा केला आहे.
K’taka polls results: “My father should be CM…” Siddaramaiah’s son as early trends show Congress leading
Read @ANI Story | https://t.co/i9Ky3yN3CQ#KarnatakaElectionResults #BJP #Congress #Karnataka #JDS #Siddaramaiah pic.twitter.com/Xbr8UNVZNy
— ANI Digital (@ani_digital) May 13, 2023
“भाजपाला सत्तेपासून बाहेर ठेवण्यासाठी आम्ही काहीही करू. कर्नाटकच्या हितासाठी माझे वडील राज्याचे मुख्यमंत्री व्हायला हवेत. काँग्रेसला राज्यात स्पष्ट बहुमत मिळणार आहे. शिवाय वरुणा मतदारसंघातून माझे वडीलही निवडून येतील”, असं यतिंद्र सिद्धरामय्या म्हणाले आहेत.
कर्नाटकमधील २२४ जागांसाठी मतदान पार पडलं असून बहुमतासाठी ११३ जागा मिळवणं कोणत्याही पक्षासाठी आवश्यक आहे. कर्नाटकमध्ये २०१८ साली झालेल्या २२२ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाने १०४ जागा मिळवत कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तरी बहुमतापासून त्यांना दूर राहावे लागले. काँग्रेसने ७८ तर जेडीएसने ३७ जागा मिळवल्या होत्या. तर बहुजन समाज पक्ष १, कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी १ आणि अपक्ष १ असे इतर उमेदवार निवडून आले होते. बहुमताचा आकडा ११२ असल्यामुळे २०१८ साली विधानसभा त्रिशंकू झाली होती.