मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा हे मागील काही दिवसांपासून एकत्र दिसत होते. त्यामुळे ते लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर आज या दोघांचा साखरपुडा होणार आहे. यासाठी अभिनेत्री प्रियंका चोप्रा (परिणीतीची बहीण) लंडनहून दिल्लीत दाखल झाली आहे. दिल्ली एअरपोर्टवर पोहचल्यानंतर प्रियंका चोप्राचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
परिणीती आणि राघवचा साखरपुडा नवी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये सायंकाळी 5 वाजता होणार आहे. त्यांच्या साखरपुड्यासाठी खास पाहुणे येणार आहेत. दिग्दर्शक करण जोहर, फराह खान, रणवीर, दीपिका पदूकोण, अर्जुन कपूर हे कलाकार साखरपुड्याला हजेरी लावणार आहेत. याशिवाय साखरपुड्याला अनेक दिग्गज नेतेमंडळी हजर राहणार आहेत. या शाही साखरपुड्यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे.
View this post on Instagram
परिणीती चोप्राच्या साखरपुड्याची खास थीम असणार आहे. तसेच परिणीतीचा हटके लूक पाहण्यासाठी चाहतेही आतुर झाले आहेत. दरम्यान, या दोघांच्या डेटींगच्या चर्चांनंतरही त्यांनी याबाबत अधिकृत माहिती न दिल्यामुळे सगळेच संभ्रमात होते. पण अखेर आज दोघांचा साखरपुडा पार पडणार आहे.