चंदीगड – कॉंग्रेस सरकारनेच पंजाबात तीनशे युनिट वीज प्रत्येक नागरीकाला मोफत द्यावी आणि राज्यातील वीजपुरवठा 24 तास सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे नेते नवज्योत सिद्धु यांनी केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, घरगुतीवापराच्या विजेबरोबरच औद्योगिक वापराचीही वीज सरकारने स्वस्त केली पाहिजे. पंजाब सरकार सध्याच वीजेवर 9 हजार कोटी रुपयांची सबसीडी देत आहे पण ती अधिक वाढवण्याची गरज आहे.
सध्या वीज ग्राहकाला 10 ते 12 रुपये प्रतियुनिट दराने वीज पुरवली जात आहे. हे दर 3 ते 5 रूपये इतके असले पाहिजेत अशी मागणीही सिद्धु यांनी केली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वीच आम आदमी पक्ष पंजाबात सत्तेवर आल्यास घरटी तिनशे युनिट वीज मोफत दिली जाईल अशी घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सिद्धु यांनी ही घोषणा केली आहे.