कोलकाता – इंधन दरवाढीचा नागरिकांनी निषेध करणे किंवा त्यांनी त्याच्या विरोधात निदर्शने करणे ही आता एक सामान्य बाब झाली आहे. पण कोलकात्यातील पेट्रोल पंप चालकांनीही आता या इंधन दरवाढीच्या विरोधात आपला मोर्चा उघडला आहे.
त्यांनी 7 जुलैला कोलकात्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांनी आपला पंप अर्धा तास बंद ठेऊन या दरवाढीचा निषेध करण्याचे योजले आहे. बुधवारी सायंकाळी 7 ते 7.30 या अवधीत इंधन विक्री बंद ठेवली जाणार आहे. कोलकाता शहरातील इंधनाचे भावही शंभराच्या जवळपास पोहचले आहेत.
त्यामुळे सामान्य जनता पुरती हैराण झाली आहे. इंधन दरवाढीचा त्याच्या विक्रीवरही विपरीत परिणाम होऊ लागला आहे असे पंप चालकांचे म्हणणे आहे. राज्यातील डिझेलच्या विक्रीतही सुमारे 50 टक्के घट झाली आहे.