नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची गुरुवारी सक्तवसुली संचालनालय (ईडी) चौकशी करणार आहे. त्या चौकशीच्या निषेधासाठी कॉंग्रेसकडून देशव्यापी निदर्शने केली जाणार आहेत.
नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ईडीने चौकशीसाठी सोनियांना समन्स बजावले आहे. त्या चौकशीवेळी होणारी निदर्शने आणि सध्या सुरू असणारी कावड यात्रा आदींमुळे दिल्लीतील वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. ती ध्यानात घेऊन दिल्ली पोलिसांनी वाहतूक सुरळित ठेवण्याच्या उद्देशातून बुधवारपासूनच काही पाऊले उचलली आहेत.
तसेच, देशाच्या राजधानीतील सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. सोनियांच्या आधी संबंधित प्रकरणात ईडीने त्यांचे पुत्र आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचीही चौकशी केली. त्यावेळीही कॉंग्रेसकडून देशभरात निदर्शने करण्यात आली होती.
महागाईवरील चर्चा असंसदीय आहे काय; प्रियंका गांधी यांचा सवाल
सोनिया आणि राहुल यांच्या विरोधातील प्रकरण बोगस आहे. केंद्र सरकारने राजकीय सुडापोटी दिलेल्या निर्देशावरून ती चौकशी केली जात आहे, असा कॉंग्रेसचा आरोप आहे. त्या चौकशीचे पडसाद सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही उमटण्याची चिन्हे आहेत.
अखिलेश यादव यांचा योगी सरकारवर निशाणा; म्हणाले, “बुलडोझर उलटेही चालते”