नवी दिल्ली – सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अविनाश भोसले आणि संजय छाब्रिया या बांधकाम व्यावसायिकांच्या तब्बल 415 कोटी रूपयांच्या मालमत्ता जप्त केल्या. येस बॅंक-डीएचएफएल घोटाळ्याच्या संदर्भात ती कारवाई करण्यात आली.
ईडीने उचललेल्या पाऊलांमुळे भोसले यांच्या 164 कोटी रूपयांच्या, तर छाब्रिया यांच्या 251 कोटी रूपयांच्या मालमत्तांवर टाच आली. भोसले यांचा मुंबईतील 102 कोटी रूपयांचा डुप्लेक्स फ्लॅट जप्त करण्यात आला. तसेच, त्यांच्या पुणे आणि नागपूरमधील जमिनींवरही जप्ती आली.
छाब्रिया यांच्या मुंबई आणि बंगळूरमधील जमिनी जप्त करण्यात आल्या. तसेच, दिल्लीतील हॉटेलमधील उत्पन्न आणि काही आलिशान कारवरही जप्ती आणली गेली. संबंधित प्रकरणात ईडीने आतापर्यंत 1 हजार 827 कोटी रूपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.
कामशेत : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणारा आरोपी 24 तासांत गजाआड
भोसले आणि छाब्रिया यांना याआधीच अटक करण्यात आली असून ते सध्या तुरूंगात आहेत. संबंधित प्रकरणात येस बॅंकेचे सहसंस्थापक राणा कपूर, डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल आणि धीरज वाधवान हेही आरोपी आहेत.
नऊ नव्या मंत्र्यांना शपथ; ममता यांच्या मंत्रिमंडळाची फेररचना