नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पाठोपाठ त्यांच्या भगिनी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधीही शिवसेना नेते संजय राऊत यांच्या समर्थनासाठी पुढे सरसावल्या. राऊत यांना पाठिंबा दर्शवत प्रियंका यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काही दिवसांपूर्वी राऊत यांना अटक केली. आता त्यांच्या पत्नीलाही ईडीने समन्स बजावले आहे. त्या पार्श्वभूमीवर, प्रियंका यांनी एक ट्विट केले. कपट आणि धाकदपटशाच्या आधारे सत्ता बळकावणे, लोकशाही चिरडणे एवढेच भाजपचे लक्ष्य आहे.
मृत्यूपूर्वी 25 प्रवाशांचे वाचवले प्राण; चालकाचा एसटी बसमध्येच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
तशाप्रकारच्या राजकारणाला बिल्कूल न घाबरता राऊत धैर्याने सामना करतात. त्यामुळेच त्यांना आणि त्यांच्या कुटूंबाला लक्ष्य केले जात आहे. भीती आणि धमकी ही भ्याडांची हत्यारे असतात. पण, त्यांचा टिकाव सत्यासमोर लागत नाही, असे प्रियंका यांनी म्हटले. राहुल याआधीच राऊत यांच्या पाठिशी उभे राहिले होते. त्यांनी राऊत यांच्या अटकेवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता.
ऑक्टोबरमध्ये संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक भारतात