नवी दिल्ली : कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याचा आनंद पक्षात असतानाच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा पाय खोलात गेला आहे. कारण पंजाबमधील संगरूर न्यायालयाने खरगे यांना मानहानी प्रकरणात समन्स बजावले आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर कर्नाटक निवडणुकीदरम्यान आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. बजरंग दल हिंदचे संस्थापक हितेश भारद्वाज यांनी त्यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने खरगे यांना हे समन्स बजावले आहे.
Sangrur court, in Punjab, summons Congress chief Mallikarjun Kharge in a Rs 100 crores defamation case filed by Hitesh Bhardwaj, the founder of Hindu Suraksha Parishad, against Kharge for allegedly making defamatory remarks against Bajrang Dal during the recently concluded… pic.twitter.com/3a02KcQ4OG
— ANI (@ANI) May 15, 2023
कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दलाची तुलना सिमी आणि अल कायदा या देशविरोधी संघटनांशी केली होती. यासोबतच कर्नाटकात सत्ता आल्यास बजरंग दलावर बंदी घालण्याचीही चर्चा काँग्रेसने केली होती. काँग्रेसच्या या घोषणेच्या निषेधार्थ हिंदू सुरक्षा परिषद आणि बजरंग दल हिंदचे संस्थापक हितेश भारद्वाज यांनी संगरूर न्यायालयात मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरोधात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे.
या प्रकरणी संगरूरच्या वरिष्ठ विभागीय न्यायाधीश रमनदीप कौर यांनी मल्लिकार्जुनला समन्स पाठवले आहे. न्यायालयाने काँग्रेस प्रमुखांना १० जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आणि आज याप्रकरणी हितेश भारद्वाज यांच्या वतीने संगरूर येथे पत्रकार परिषदही घेण्यात येणार आहे.