Pune : नदीच्या मधोमध अडकला तरुण.. 30 मिनिटे मृत्यूशी दिली झुंज.. अग्निशमन दलाकडून मिळाले जीवदान

Updated On:

पुणे – पुलावरून नदीत उडी मारलेल्या तरुणाचे प्राण वाचवण्यात अग्नी शमन दलाला यश आले आहे. कल्याणीनगर येथील नदीच्या मधोमध तरुण अडकून पडला होता. अग्नी शमन दलाला याची माहिती मिळताच त्यांनी मदतकार्यासाठी धाव घेतली आणि तरुणाचे प्राण वाचवले.

अग्नी शमन दलाला या अपघताची माहिती मिळताच बी.टी.कवडे रोड व हडपसर अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते. घटनास्थळी एक तरुण नदीच्या मधोमध जलपर्णी व एका झाडाचा आसरा घेऊन पाण्यात अडकला असल्याचे जवानांनी दिसून आले. जवानांनी तत्परता दाखल तरुणाच्या मदतीसाठी रस्सी आणि लाईफ जॅकेट पाण्यामध्ये टाकले.

यानंतर जवानांनी स्वतः तरुणाजवळ जात त्याच्याशी संवाद साधत त्याला धीर दिला. सुमारे तीस मिनिटे चाललेल्या या ऑपरेशनमध्ये अग्नी शमन दलाच्या जवानांना तरुणाचे प्राण वाचवण्यात यश आले. हा अपघात नेमका कसा घडला हे अद्याप समजू शकलेलं नाही.

तरुणाचे नाव समजू शकले नसून वय अंदाजे २५ वर्ष आहे. तसेच तरुणाला काही प्रमाणात दुखापत झाल्याने शासकीय रुग्णवाहिका १०८ मधून दवाखान्यात पाठवण्यात आले. घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी पुढील तपास सुरु केला.

या कामगिरीत अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे तसेच नदीमध्ये पाण्यात पोहत जाऊन तरुणाला जीवदान देणारे तांडेल राजाराम केदारी, संदिप रणदिवे व फायरमन चंद्रकांत नवले, सुरज बडे आणि वाहनचालक अक्षय कलशेट्टी, अमित सरोदे व इतर फायरमन प्रताप फणसे, सूरज बडे, प्रशांत नवगिरे, शरद नवगिरे,नितेश डगळे, अजिंक्य खाडे यांच्या धाडसी कामगिरीमुळे एका तरुणांचे प्राण वाचले.

आणखी संबंधित बातम्या

Pune Traffic Fine : पुणेकरांच्या खिशाला दुहेरी कात्री! वाहतूक दंडाचा 'हा' नियम बेकायदेशीर? हायकोर्टाचा मोठा दणका

2026-03-28 06:30:48

Pune Traffic Fine : पुणेकरांच्या खिशाला दुहेरी कात्री! वाहतूक दंडाचा 'हा' नियम बेकायदेशीर? हायकोर्टाचा मोठा दणका

Pune Metro : पुणेकरांनो सावधान! मेट्रो मार्गाच्या ५० मीटर परिसरात बांधकाम करताय? आधी ही बातमी वाचा

2026-03-27 07:00:10

Pune Metro : पुणेकरांनो सावधान! मेट्रो मार्गाच्या ५० मीटर परिसरात बांधकाम करताय? आधी ही बातमी वाचा

Pune News : पुणे की बारामती? एमपीसीबीच्या कार्यालयावरून राजकारण तापलं; वाचा नेमका काय आहे वाद

2026-03-27 06:00:23

Pune News : पुणे की बारामती? एमपीसीबीच्या कार्यालयावरून राजकारण तापलं; वाचा नेमका काय आहे वाद

Pune News : चांदणी चौक ते भूगाव प्रवास होणार सुसाट! २०० कोटींच्या निधीचा प्रस्ताव; पाहा, काय आहे मास्टरप्लॅन

2026-03-27 05:15:04

Pune News : चांदणी चौक ते भूगाव प्रवास होणार सुसाट! २०० कोटींच्या निधीचा प्रस्ताव; पाहा, काय आहे मास्टरप्लॅन

Metro Tunnel Safety : पेठांमधील जुन्या वाड्यांचा पुनर्विकास धोक्यात? मेट्रो बोगद्याच्या घटनेनंतर पालिकेचा मोठा निर्णय..जाणून घ्या

2026-03-26 06:30:29

Metro Tunnel Safety : पेठांमधील जुन्या वाड्यांचा पुनर्विकास धोक्यात? मेट्रो बोगद्याच्या घटनेनंतर पालिकेचा मोठा निर्णय..जाणून घ्या