मुंबई – काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यानंतर आता त्यांची मुलगी प्रियांका गांधी वद्रा यांना देखील करोनाची लागण झाली आहे. प्रियांका गांधी यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्या लोकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
तत्पूर्वी, प्रियांका गांधी वढेरा या दोन दिवसांचा लखनौ दौऱ्यावरून बुधवारी रात्री दिल्लीत परतल्या. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातच प्रियांका गांधीही त्यांच्या संपर्कात आल्या, त्यानंतर त्या लखनऊहून दिल्लीला परतल्याचं सांगण्यात येत आहे. आता त्यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.
प्रियांका गांधी आहे मोठी जबाबदारी
मार्चमध्ये उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या प्रियंका गांधी वड्रा यांनी ‘लडकी हूं, लढा शक्ती हूं’ असा नारा दिला होता आणि 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पक्षाचे पुनरुज्जीवन करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत 403 सदस्य असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेत काँग्रेसला फक्त दोन जागा मिळाल्या होत्या. त्याचबरोबर कपिल सिब्बल यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसला राज्यसभेत या राज्यातून प्रतिनिधित्व नाही. सिब्बल यांनी सपाच्या पाठिंब्याने राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.