मुंबई – वसुली प्रकरणात फरार असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांच्या अटकेला तूर्तास स्थगिती दिली आहे आणि त्यांंना तपासात सहकार्य करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. परमबीर सिंग यांना अटक होणार नाही, मात्र त्यांनी सीबीआयसमोर हजर राहून तपासात सहकार्य करावे, असे न्यायालयान म्हटले आहे.
Param Bir Singh (former Mumbai Police Commissioner) is very much in the country and he is not absconding – his advocate tells the Supreme Court. pic.twitter.com/imxjQ0qxna
— ANI (@ANI) November 22, 2021
याचिकेवरील सुनावणीदरम्यान माजी पोलीस आयुक्तांच्या वकिलांनी सांगितले की, परमबीर सिंग देश सोडून पळून गेलेला नाही. ते फरार नाहीत, तर देशातच आहे. मुंबई पोलिसांकडून त्याच्या जीवाला धोका असल्याने ते समोर येत नसल्याचे परमबीर सिंग यांच्या वकिलांनी सुनावणी दरम्यान सांगितले आहे.
Former Mumbai Police Commissioner Singh tells Supreme Court that he is ready to appear before CBI within 48 hours. Supreme Court grants protection from arrest to him and directs him to join the investigation. pic.twitter.com/0fSbDWc3va
— ANI (@ANI) November 22, 2021