#AUSvIND : वॉर्नरबाबत अद्याप संभ्रमच

मेलबर्न – ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही, याबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे. त्याने तीन दिवसांपूर्वी संघाच्या सराव सत्रात सहभाग घेतला होता. मात्र, आता दोन दिवस त्याने सरावही केलेला नाही.

तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघात वॉर्नरच्या समावेशाविषयी त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान वॉर्नरच्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते. त्यामुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकलेला वॉर्नर तिसऱ्या कसोटीत पुनरागमनाविषयी उत्सुक आहे.

जो बर्न्सला वॉर्नरच्या जागी संघात निवडले होते. मात्र, जेव्हा वॉर्नर खेळणार असल्याचे स्पष्ट झाले तेव्हा बर्न्सला वगळण्यात आले. आता पुन्हा वॉर्नर खेळणार की नाही, असा संभ्रम निर्माण झाला आहे. तर मग बर्न्सला संघात पुन्हा स्थान देण्यात येणार का, असाही प्रश्‍न निर्माण झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.