जि. प. अध्यक्षा निर्मला पानसरे यांची ग्वाही
राजगुरूनगर – जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी केले. वरुडे (ता. खेड) येथील सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या.
यावेळी पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, बाजार समितीचे संचालक धैर्यशील पानसरे, पोलीस पाटील संघटनेचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदेपाटील, खेड शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष धर्मराज पवळे, वरुड्याचे सरपंच मारुती थिटे, ऍड. पोपटराव तांबे, आनंदराव तांबे, दिलीप चौधरी, साहेबराव तांबे, मच्छिंद्रनाथ तांबे, भालचंद्र रोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
जि. प. अध्यक्षा पानसरे म्हणाल्या, जिल्ह्यातील शेतकरी, महिला, युवक, शेतकरी व वंचित घटकांच्या शिक्षण, आरोग्य, बांधकाम आदी सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशिल राहील.
यावेळी माजी सैनिक विजय चौधरी यांची सहायक मोटार वाहन निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून राम वाळुंज यांनी आभार मानले.