नवी दिल्ली – सध्या कापसाचे दर किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी पातळीवर आहेत. त्यामुळे भारतीय कापूस महामंडळाने कापूस खरेदी चालू केली असून या हंगामात आतापर्यंत किमान आधारभूत किमतीवर 32.81 लाख गाठी कापूस खरेदी करण्यात आल्याची माहिती महामंडळाने जारी केली आहे. (Commencement of purchase of cotton from Cotton Corporation; Purchased 32.81 lakh bales so far)
गेल्या वर्षी कापसाचे दर किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त पातळीवर बाजारात होते. त्यामुळे महामंडळाने गेल्या वर्षी किमान आधारभूत किमतीच्या आधारावर कापूस खरेदी केली नव्हती. मात्र यावर्षी लगेच हस्तक्षेप करून कापसाची खरेदी करण्यात येत आहे.
सध्या खरेदी करण्यात आलेला बहुतांश कापूस आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगणा राज्यातून खरेदी करण्यात आला आहे. शेतकर्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा अधिक दर मिळावा, अशी महामंडळाची इच्छा असल्याचे सांगण्यात आले.