दिलासादायक! कोविडचा देशात 543 दिवसांतील नीचांक; पाहा आकडेवारी

नवी दिल्ली – भारतात गेल्या 24 तासांत कोविडचे 7579 नवीन रूग्ण आढळून आले आहेत. नव्याने आढळून येणाऱ्या रूग्ण संख्येत हा गेल्या 543 दिवसांतील नीचांक मानला जात आहे. दरम्यान या 24 तासांत देशातील 236 कोविड रूग्ण दगावल्याने या रोगाने मरणाऱ्यांची संख्या आता 4 लाख 66 हजार 147 इतकी झाली आहे.

सध्या करोनाच्या सक्रिय बाधितांचे प्रमाण 1 लाख 13 हजार 584 इतके आहे. हे प्रमाण एकूण लागण झालेल्या व्यक्तींच्या तुलनेत 0.33 टक्के इतके आहे. देशातील करोनाचा रिकव्हरी रेट 98.32 टक्के इतका झाला आहे. देशात करोना लसीकरणाचे प्रमाण वाढले असल्याने त्याचा विधायक परिणाम या रोगाच्या नियंत्रणावर झाला आहे. देशात आता नागरीकांना करोनाचा दुसरा डोस देण्याचे प्रमाणही लक्षणीयरित्या वाढत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.