आयुष्मानच्या ‘बाला’चा मजेदार ट्रेलर प्रदर्शित 

ड्रिमगर्ल चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर  आयुष्मान खुराणाचा मोस्ट अवेटेड ‘बाला’ चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसविण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाआहे. या ट्रेलरला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे.

आयुष्मान खुराणा समाजातील केसगळतीवर चित्रपट आधारित असून यामध्ये कॉमेडीचा तडकाही लावण्यात आला आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराणासोबत यामी गौतमी आणि भूमी पेडणेकरही मुख्य भूमिकेत असणार आहेत.

लेखन निरेन भट्ट यांनी तर मॅडॉक फिल्म्सने बालाची निर्मिती केली आहे. बाला चित्रपट ७ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.

दरम्यान, आयुषमान ‘बाला’नंतर ‘गुलाबो सिताबो’ आणि ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.