पारनेर – संपूर्ण यंत्रणा राबवून देखील खासदार डॉ. सुजय विखे यांच्या नेतृत्चाखाली भाजपला बाजार समितीच्या निवडणुकीत खाते देखील उघडता आले नाही. या उलट आमदार नीलेश लंके व शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी हे या निवडणुकीत एकत्र आल्याने महाविकास आघाडीचा विजयाचा मार्ग सुकर होऊन पारनेर बाजार समितीच्या सर्वाच्या सर्व 18 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजय झाले. खा. विखेंच्या भाजपचा पुर्णपणे धुव्वा उडाला.
मतमोजणी सुरूवात झाल्यापासून मविआ आघाडीवर होती.त्यामुळे आघाडीच्या बाजूने निकालचा कल लक्षात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नीलेश लंके व शिवसेना माजी आमदार विजय औटी यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली. आ. लंके व औटी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना यांच्यात वाटाघाटी 13 जागा राष्ट्रवादी तर 5 जागा शिवसेनेला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना शह देण्यासाठी हे मनोमिलन करण्यात आले होते. मविआने आघाडी केल्याने भाजपचे पानीपत केले आहे. या निर्णयाकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर निवडणुकीचा निकाल हाती आला असून मविआकडून भाजपचा दारुण पराभव झाला आहे.
खासदार डॉ. विखे व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या साठी मोठा धक्का मानला जात आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस व ठाकरे गट या महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व आ. लंके, माजी आमदार औटी, कॉंग्रसचे तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकले यांनी केले. तर भाजप पुरस्कृत जनसेवा पॅनलचे नेतृत्व खासदार विखे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, विश्वनाथ कोरडे, तालुकाध्यक्ष सुनील थोरात, वसंतराव चेडे, बाबासाहेब तांबे, गणेश शेळके, डॉ. भाऊसाहेब खिलारी यांनी केले.
विजयी उमेदवार पुढील प्रमाणे : सोसायटी मतदारसंघ- प्रशांत गायकवाड (814), अशोकराव सावंत (694), आबासाहेब खोडदे (757), बाबासाहेब तरटे (738), संदीप सालके (733), रामदास भोसले (738), किसन सुपेकर (679). महिला राखीव- पद्मजा श्रीकांत पठारे (923), मेघा श्रीरंग रोकडे (784). इतर मागास प्रवर्ग- गंगाराम बेलकर (829), बाबासाहेब नर्हे (789). ग्रामपंचायत मतदारसंघ- विजय पवार (596), किसनराव रासकर (605), भाऊसाहेब शिर्के (507). अनुसूचित जाती व जमाती- शंकर नगरे (592). व्यापारी मतदारसंघ- अशोकलाल कटारिया (338), चंदन बळगट (389). हमाल मापाडी- तुकाराम चव्हाण (65),नवनाथ बुगे (35).