सातारा – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवनभर सनातन हिंदू धर्माचा विरोध करून त्याची चिकित्सा केली. अखेर या धर्माचा त्याग करून बुद्धाचा धम्म स्वीकारला. परंतु, आज त्याच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नावं घेऊन सनातन धर्माचा अभिमान असल्याचे बोलले जात आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार राम सातपुते यांनी गुरुवारी विधानसभेत आपल्या अकलेचे तारे तोडले ते पाहता गटारात लोळणाऱ्या डुकराने अभिमनाने “होय मी डुक्कर आहे व गटारातच माझा स्वर्ग आहे’, याचाच मला अभिमान आहे असे म्हणण्यासारखे आहे, अशी टीका “उपरा’कार लक्ष्मण माने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली.
सातपुते यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याचा कोणताही अधिकार नाही, राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांचा लवलेशही ज्याचात नाही तो माणूस जिवंत असून मेल्यासारखा असल्याची टीका त्यांनी केली. गुरुवारी विधानसभेत बोलताना आ. राम सातपुते म्हणाले, “”मी हिंदू दलित आहे, माझे वडील जोडे शिवायचे याचा मला अभिमान आहे. मला सनातन धर्माचा अभिमान आहे.” असे बोलताना मला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आरक्षण मिळाल्याने मी आमदार झालो असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यामुळे मिळाले नाही, असे वादग्रस्त वक्तव्य देखील केले.
यावर लक्ष्मण माने यांनी प्रतिक्रिया दिली. लक्ष्मण माने म्हणाले, “”धर्माच्या नावावर हजारो वर्ष येथील उच्चवर्णियांनी बहुजन समाजाला अमानवी जीवन जगण्यास भाग पाडून त्यांचे शोषण केले. राम सातपुते यांच्यासारखे लोक उच्चवर्णीयांची सत्तेसाठी लाचारी पत्कारतात. यामुळे जातीव्यवस्थेचा पुरस्कार करणारे, कंबरेला खराटा बांधणारे गुलाम आहेत, तोपर्यंत मनुवादी संघिष्टांना कायमच तुपाबरोबर जेवता येणार आहे. सातपुते यांच्या मनुवादी वर्तनाचा मी तीव्र निषेध करतो.”