आ. रोहित पवार यांनी घडवले नेत्यामधील माणुसकीचे दर्शन

गोंदवले  -आपल्या कर्तृत्वाने आणि मितभाषी स्वभावाने परिचित असलेले जामखेड मतदारसंघाचे आ. रोहित पवार यांनी आपल्या हळव्या मनाचे व माणुसकीचे दर्शन घडवले. खटाव व माण तालुक्‍याच्या सरहद्दीवर अपघातग्रस्तांना त्यांनी रस्त्यात थांबून मदत केली. यामुळे त्यांच्याबद्दल आदराची भावना व्यक्‍त होत आहे. 

याबाबत माहिती अशी, आ. रोहित पवार, त्यांचे वडील राजेंद्र पवार आणि मातोश्री सुनंदाताई हे तिघे जण कराड येथे एका नातेवाइकाचा अंत्यविधी आटोपून बारामतीकडे परत निघाले होते. छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, पत्रकार शेखर जाधव व मुन्ना मुल्ला यांच्यासोबत ते वडूज-गोंदवले प्रवास करत होते.

त्यावेळी मांडवे (ता. खटाव) ते पिंगळी (ता. माण) या दरम्यान दहिवडीतील शेतकऱ्याची मारुती व्हॅन अपघातात उलटून रस्त्याकडेला गेली होती. हा अपघात दिसल्यावर आ. रोहित पवार यांनी चालकाला गाडी थांबवायला सांगितले.

ते तातडीने अपघातस्थळी धावत गेले. जखमी शेतकऱ्याची चौकशी करून त्याची मारुती व्हॅन ढकलून रस्त्यावर आणण्यासाठी स्वतः मदत केली. त्यामुळे नेता कसा असावा, याची चर्चा दिवसभर घटनास्थळी सुरू होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.