मगर महाविद्यालयाला हॅंण्डबॉल स्पर्धेत दुहेरी मुकुट

पुणे: पुणे विभागीय शालेय हॅंण्डबॉल (मुले / मुली 19 वर्षाखालील) स्पर्धेत अण्णासाहेब मगर महाविद्यालयाने दुहेरी मुकुट मिळविला.

या स्पर्धेत अण्णासाहेब मगर महाविद्यालयाने दयानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा 25-18 असा पराभव केला. मगर महाविद्यालयाकडून दत्तात्रय पिलाणे 8 गोल, दीपक बोराडे 4 गोल, गोपाल साबावट 4 गोल, दीपक आतकरे 3 गोल, रोहन खुणे 3 गोल, ओंकार हरपळे 2 गोल, गौरव स्वामी 1 गोल फटकावला.

मुलींचा अंतिम सामना अण्णासाहेब मगर महाविद्यालय आणि विद्या प्रतिष्ठान इंदापूर यांच्यात झाला. त्यात मगर महाविद्यालयानेच 22-11 असा विजय प्राप्त केला.

मयुरी सुरवसे 8 गोल, धनश्री ढमाळ 7 गोल, भगवती शिंदे 3 गोल, मयुरी धेंडे 2 गोल, तेजश्री निकते 2 गोल, गोलकीपर प्रांजली चव्हाण, प्राजक्ता ढमढेरे यांनी चांगला खेळ केला.

Leave A Reply

Your email address will not be published.