आता उत्सुकता निकालाची!

ग्रामीण भागातील दहा मतदारसंघात 97 उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद

पुणे – जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दहाही विधानसभा मतदारसंघात सोमवारी (दि. 21) सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदान पार पडले. सलग दोन-तीन दिवस पडत असलेल्या पावसाने मतदानादिवसी विश्रांती घेतल्याने शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात मतदानाचा उत्साह दिसला.

जिल्ह्यात सर्वाधिक मतदान इंदापूरमध्ये 75.44 टक्के, तर सर्वांत कमी मतदान भोरमध्ये 63.15 टक्के इतके झाले. जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर-हवेली, भोर, खेड-आळंदी, जुन्नर, शिरूर-हवेली, आंबेगाव-शिरूर, मावळ या दहाही मतदारसंघातील एकूण 97 मतदारांचे भवितव्य मशीनमध्ये बंद झाले. जिल्ह्यात दुरंगी, तिरंगी लढती झाल्याने आता उत्सुकता गुरुवारी (दि. 24) होणाऱ्या मतमोजणीची आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.