मंचर -मंचर (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या पथकाने तोंडावर मास्क न लावणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करून 500 रुपयांचा दंड मंगळवारी (दि. 30) वसूल केला. मंचर शहरात स्थानिक रहिवासी असलेल्या ज्येष्ठ नागरिकास करोनाची बाधा झाली असल्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. येथे रोज सुमारे 40 गावांचा दैनंदिन संबध येतो.
मंचर ग्रामपंचायतीच्या चार कर्मचाऱ्यांच्या पथकाने मास्क न लावणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली असून 500 रुपये वसूल करण्यात आला. दिवसभरात अशा 58 दुकानदारांकडून दंड वसूल करण्यात आल्याची माहिती सरपंच दत्ता गांजाळे यांनी दिली.